MAHAVITARAN BHARTI 2024
महाराष्ट्रातील तरुणांसाठी कायमस्वरूपी MAHAVITARAN BHARTI 2024 मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.पदवीधर तरुणांनी लवकरात लवकर जूनियर असिस्टंट (अकाउंटंट) या पदासाठी अर्ज करावा.या पदाची लिंक सक्रिय झाली आहे.
MAHAVITARAN BHARTI 2024
महावितरण बद्दल थोडक्यात माहिती
महावितरण ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) म्हणून ओळखली जाते. महावितरण नावावर सर्व मालकी अधिकार हा महाराष्ट्र शासनाचा आहे. 31 मे 2005 रोजी महावितरणची स्थापना करण्यात आली होती. कंपनीचा मूळ उद्देश शेवटच्या ग्राहकापर्यंत वीज पुरवठा करणे हा होता.
महावितरणचे मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
- विजेचे वितरण करण्यासाठी यंत्रणांचा विकास करणे.
- त्याच्यावरती देखरेख ठेवणे.
- त्याची देखभाल करणे.
महावितरण कडून आतापर्यंत अडीच कोटीच्या वर ग्राहकांना सेवा पुरवण्यात आली आहे.महावितरण ही आशियातील सर्वात मोठी वीज कंपनी आहे.
जाहिरात क्रमांक-05/2023
पदाचे नाव- जूनियर असिस्टंट (अकाउंटंट)
एकूण रिक्त पदांची संख्या-468
शैक्षणिक पात्रता- BCOM/BMS/BBA/MSCIT किंवा समतुल्य
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा- CLICK HERE TO APPLY FOR MSEDL 2024
MAHAVITARAN BHARTI 2024 NOTIFICATION PDF
महावितरणने कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाची सविस्तर माहिती देणारे PDF जाहीर केले आहे. यामध्ये एकूण 468 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांविषयी संपूर्ण माहिती देणारे PDF खाली दिले आहे. जूनियर असिस्टंट (अकाउंटंट) पदाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील PDF डाऊनलोड करावे.
CLICK HERE TO DOWNLOAD MAHAVITARAN BHARTI NOTIFICATION PDF
MAHAVITARAN BHARTI 2024 VACANCY DETAILS
महावितरण कडून जाहीर करण्यात आलेल्या भरतीमध्ये एकूण 468 पदे भरली जाणार आहेत. ही पदे प्रवर्गानुसार भरली जाणार आहेत. खालील तक्त्यामध्ये रिक्त जागांची संपूर्ण माहिती दिली आहे. प्रवर्गानुसार एकूण किती पदे रिक्त आहेत याची माहिती देण्यात आली आहे.
प्रवर्ग | एकूण रिक्त पदे |
अनुसूचित जाती | 72 |
अनुसूचित जमाती | 47 |
विमुक्त जाती | 14 |
भटक्या जाती (ब) | 07 |
भटक्या जाती (क) | 18 |
भटक्या जाती (ड) | 17 |
विशेष मागास प्रवर्ग | 04 |
इतर मागास प्रवर्ग | 116 |
आर्थिक दुर्बल घटक(EWS) | 71 |
अराखीव | 102 |
महत्त्वाची नोंद– महावितरण कडून जाहीर करण्यात आलेल्या पदसंख्या मध्ये वाढ करण्याचा किंवा दिलेल्या पदांमध्ये घट करण्याचा अधिकार सर्व महावितरणकडे राहील.
MAHAVITARAN BHARTI 2024 QUALIFICATION
शैक्षणिक पात्रता
महावितरणने चालू वर्षात एकूण 468 कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांची भरती जाहीर केली आहे.या जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. खालील शैक्षणिक अटींची पूर्तता उमेदवार करत असतील तर उमेदवारांनी अर्ज करावा.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
कनिष्ठ सहाय्यक लेखा | 1.उमेदवाराकडे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. 2.पदवी मध्ये B.COM/BMS/BBA या अभ्यासक्रमांचा समावेश असणे आवश्यक आहे. 3.उमेदवाराने संगणकाचे ज्ञान/ माहिती असणारा MSCIT किंवा समतुल्य कोर्स पूर्ण केलेला असावा. | कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कुठल्याही अनुभवाची आवश्यकता नाही. |
महत्त्वाची नोंद
- ज्या उमेदवाराकडे MSCIT प्रमाणपत्र नसेल त्याने रुजू झाल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीच्या आत ते प्रमाणपत्र सादर करावे
- व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा/ Tally प्रमाणपत्र/ computer science यांपैकी एका विषयाचा समावेश पदवी अभ्यासक्रमात असावा.
MAHAVITARAN BHARTI 2024 AGE LIMIT
वयोमर्यादा
महावितरणच्या कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा पुढे सांगितलेली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय29/12/2023 पर्यंत 30 वर्ष असावे. तसेच प्रवर्गानुसार वयामध्ये खालील प्रमाणे सूट देण्यात आलेली आहे.
वयगणकयंत्र :येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.
प्रवर्ग | वयामध्ये सवलत |
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक | 35 वर्षे |
अपंग उमेदवार | 45 वर्षापर्यंत |
माजी सैनिक | 45 वर्षापर्यंत |
खेळाडू | 35 वर्षापर्यंत |
अनाथ उमेदवार | 35 वर्षापर्यंत |
महावितरण कर्मचारी | 57 वर्षापर्यंत |
टीप- कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराची वय निश्चित करण्यासाठी एसएससी(SSC)प्रमाणपत्रावर असलेली जन्मतारीख विचारात घेतली जाईल याची नोंद घ्यावी.
MAHAVITARAN BHARTI 2024 FORM FEES Maharashtra
परीक्षा फीस
महावितरणच्या कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फीस भरावयाची आहे. एकदा फीस भरल्यानंतर कुठल्याही कारणास्तव रक्कम ही उमेदवारांना परत केली जाणार नाही. ऑनलाइन परीक्षा फीस खालील तक्त्यात दिलेल्या माहिती प्रमाणे आकारली जाईल. परीक्षा फीस पूर्ण भरलेली असेल तरच अर्ज स्वीकारले जातील याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
प्रवर्ग | परीक्षा फीस |
खुल्या जाती | Rs 500/-+GST |
SC/ST/ORPHAN | Rs 250/-+GST |
Person with disabilities | No fees |
Ex servicemen | No fees |
महत्त्वाची नोंद
- ज्या उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाने दिलेले जात प्रमाणपत्र (Caste Certificate) नसेल त्या उमेदवाराची परीक्षा फीस ही खुल्या गटा प्रमाणेच आकारली जाईल. तसेच पूर्ण परीक्षा प्रक्रियेसाठी तो उमेदवार खुल्या गटातील उमेदवार म्हणून प्राधान्य दिले जाईल.
- वरील परीक्षा फीस ही Non-Refundable असणार आहे.
MAHAVITARAN BHARTI 2024 Exam Pattern
परीक्षा पद्धती
महावितरणची कनिष्ठ सहाय्यक लेखापाल ची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे. एकूण 150 गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. खालील तक्त्यामध्ये परीक्षेचे स्वरूप स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Section | Topics | Total Questions | Total Marks |
Professional Knowledge | Accounts & Auditing | 50 Questions | 110 Marks |
General Aptitude | Reasoning | 40 Questions | 20 Marks |
Quantitative Aptitude | 20 Questions | 10 Marks | |
Marathi Language | 20 Questions | 10 Marks |
- परीक्षा ही वस्तुनिष्ठ (Objective Type question) स्वरूपाची आहे. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत.
- परीक्षा ही दोन विभागात घेतली जाणार आहे.
1.Professional Knowledge
2. General Aptitude
- चुकीच्या उत्तरासाठी1/4 एक चतुर्थांश गुण वजा केले जाणार आहेत.(Negative Marking)
- परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे.
Procedure To Apply For Mahavitaran Bharti 2024
- कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम दिलेल्या जाहिरातीतील अटींची पूर्तता होते की नाही याची खात्री करून घ्यावी.
- जे उमेदवार या पदासाठी अर्ज करणार आहेत ते जर सरकारी किंवा निमसरकारी सेवेत काम करतात. अश उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस ना हरकत प्रमाणपत्र(No Objection Certificate)सादर करावे.
- सदरील परीक्षा ही उमेदवारांना हॉल तिकीट वरील दिलेल्या परीक्षा केंद्रावरच होईल.
- परीक्षा केंद्र, परीक्षेचे ठिकाण, परीक्षेची वेळ यामध्ये बदल करण्याबाबत उमेदवाराची कुठलीही विनंती स्वीकारली जाणार नाही.
- कोणतेही परीक्षा केंद्र रद्द करण्याचा किंवा परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्याचा अधिकार संपूर्णपणे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीकडे मर्यादित राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवाराने निवड केलेल्या परीक्षा केंद्रा शिवाय इतर परीक्षा केंद्रांवर बोलविण्याचा अधिकार पूर्णपणे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कडे असणार आहे.
- परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याची जबाबदारी उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
- कोणताही प्रवास खर्च किंवा भत्ता उमेदवारांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी दिला जाणार नाही.
- परीक्षा केंद्रावरील उमेदवारांचे गैरवर्तणूक ही त्यांची उमेदवारी रद्द करू शकते.
How to Apply For Mahavitaran Bharti 2024
- उमेदवारांनी कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी अर्ज करताना www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अधिकृत संकेतस्थळाशिवाय कुठलेही माध्यम अर्ज करण्यासाठी उपलब्ध नाही.
- पत्रव्यवहार द्वारे कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे स्वतःचा वैद्य ईमेल आयडी असावा. ई-मेल आयडी उपलब्ध नसल्यास त्याने तो नवीन बनवून घ्यावा.
- अर्ज नोंदणी साठी उमेदवाराने “Click Here for New Registration” येथे करावे. तेथे स्वतःचे नाव, वैयक्तिक माहिती आणि ईमेल आयडी भरावा.
- उमेदवारांना ई-मेल आयडी आणि एसएमएस वर त्यांचा नोंदणी क्रमांक( Registration Number) आणि Password पाठविण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. एकदा अर्जाचे Final Submit झाल्यानंतर कोणत्याही माहिती मध्ये दुरुस्ती केली जाणार नाही.
- पडताळणी करूनच माहिती Save and Next करावी.
- उमेदवारांनी photo आणिsignature upload करताना दिलेल्या आकाराचे photo आणि signature अपलोड करावे.
- . पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर तो Preview करून पहावा.
- Final Submit नंतर Payment Tab ला Click करावे. व Payment पूर्ण करावे.
- आणि शेवटी पूर्ण अर्ज सबमिट करावा.
Mahavitaran Bharti 2024 Salary
पगार
जे उमेदवार यशस्वीरित्या चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होतील. तसेच कागदपत्रे पडताळणी मधून जे उमेदवार निवडले जातील त्यांना पुढील माहितीप्रमाणे महावितरण करून दरमहा चांगले मानधन देण्यात येईल.
वर्ष | मानधन |
पहिल्या वर्षासाठी | 19000 रुपये दरमहा |
दुसऱ्या वर्षासाठी | 20000 रुपये दरमहा |
तिसऱ्या वर्षासाठी | 21000 रुपये दरमहा |
commerce आणि finance मध्ये उच्च पदवीधर post graduate असणाऱ्या उमेदवारांना अधिकचे 1000 रुपये दर महा मानधन देण्यात येईल.
तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टर नंतर उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात येईल. आणि कंपनी नियमाप्रमाणे दरमहा 29035 पगार देण्यात येईल.
Mahavitaran Bharti 2024 Important Dates
महत्त्वाच्या तारखा
खालील तक्त्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ( महावितरण )यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत महत्त्वाच्या तारखा देण्यात आले आहे. यामध्ये परीक्षेची जाहिरात, परीक्षेसाठी नोंदणी तसेच परीक्षा दिनांक याबाबत माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक खालील तक्ता अभ्यासावा.
परीक्षेची जाहिरात | 31 December 2023 |
Mahavitaran bharti 2024 online apply date | January 2024 |
Mahavitaran bharti 2024 last date | लवकरच कळविण्यात येईल |
परीक्षा दिनांक संभाव्य | Feb/March 2024 |
FREQUENTLY ASKED QUESTION
Ans.468
Ans.150 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
Ans.पहिल्या वर्षासाठी 19000 रुपये.
दुसऱ्या वर्षासाठी 20000 रुपये.
तिसऱ्या वर्षासाठी 21000 रुपये.