Lek Ladki Yojana Maharashtra 2024.
Lek Ladki Yojana Maharashtra 2024: स्त्रीभ्रूणहत्या थांबवणे, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा जन्मदर वाढविणे त्यांच्या शिक्षणाविषयी प्रोत्साहन देण्यासाठी. माननीय राज्य शासनाद्वारे दिनांक 1 ऑगस्ट 2016 रोजी कन्या भाग्यश्री(सुधारित) योजना सुरू केली होती.परंतु या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब विचारात घेऊन मुलींच्या सशक्तीकरणासाठी एक नवीन योजना सुरू करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत होते.त्याच अनुषंगाने चालू वर्षाच्या अधिवेशनात माननीय मंत्रिमंडळाद्वारे ‘लेक लाडकी’ या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली. सदर योजनेमार्फत मुलींच्या विकासासाठी तब्बल 101000 रुपये अनुदानाची तरतूद केली गेली आहे.
लेक लाडकी या योजनेबद्दल थोडक्यात माहिती
महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पिवळ्या व केशरी या दोन्ही रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर त्यांना एकूण पाच टप्प्यांमध्ये सदर अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. पूर्वीची माझी कन्या भाग्यश्री(सुधारित) या योजनेची जागा घेऊन त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य सरकारने राज्यात 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘ लेक लाडकी योजना’ सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे.या योजनेचा उद्देश काय आहे? या योजनेसाठी अर्जदार लाभार्थी कोण असणार आहे? या योजनेचा लाभ कशाप्रकारे होणार आहे? अर्ज करताना कुठले कागदपत्र लागतील? अर्ज कसा करावा? इत्यादी सर्व माहिती सदर लेखात दिली गेली आहे.
लेक लाडकी योजना उद्देश:
ही योजना चालू करण्याचा मूळ उद्देश हा मुलींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करणे हा आहे या योजनेमुळे तिच्या जन्मानंतर तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, तिला चांगले शिक्षण मिळावे यासाठी, तिला उच्च शिक्षण घेता यावे याची जिम्मेदारी आता महाराष्ट्र शासन घेणार आहे.
- मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.
- मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे.
- कुपोषण कमी करणे.
- मुलींचे जीवनमान उंचावणे.
- मुलींचा मृत्यू दर कमी करणे.
- बालविवाहाला आळा घालणे.
लेक लाडकी योजना या योजनेचा लाभ कसा मिळेल?
योजनेअंतर्गत दिलेल्या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर सदर योजनेचा लाभ मिळणार आहे.या योजनेमुळे तिला उत्तम आरोग्य, चांगले शिक्षण मिळेल एकूणच तिचा सर्वांगीण विकास होणार आहे. तिला स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी, तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे. यामुळे एकूणच तिचे संपूर्ण आयुष्य सुख समृद्ध होणार आहे.
या योजनेअंतर्गत मिळणारा एकूण लाभ पाच टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे.
मुलीचा जन्म झाल्यानंतर:
1.एप्रिल 2023 रोजी त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे या योजनेचा पहिला हप्ता रुपये पाच हजार तिच्या नावे जमा केला जाईल. याचा उपयोग तिच्या सुदृढ वाढीसाठी होईल.वयाचे शून्य ते पाच हा काळ बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या वयात पौष्टिक अन्न, चांगले आरोग्य, पोषक आहार इत्यादी बाबी बाळाच्या सुदृढ वाढीसाठी खूप गरजेच्या असतात. गरीब कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर या बाबींची पूर्तता करणे कठीण जाते आणि त्यामुळे कित्येक मुलींना कुपोषणाला बळी पडावे लागते. याच गोष्टीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तिचे पालन पोषण चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी पाच रुपये पाच हजार एवढी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ज्यामुळे कुटुंबावरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल.
इयत्ता पहिली:
सध्याच्या काळात गरीबी आणि दारिद्र्यामुळे कित्येक मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. शिक्षणाचा खर्च हा गरीब कुटुंबातील पालकांना उचलणे जड जाते. या उद्देशाने मुलीच्या वयाच्या सहाव्या वर्षी म्हणजेच इयत्ता पहिलीत गेल्यानंतर रुपये सहा हजार एवढी रक्कम दिली जाईल.
इयत्ता सहावी:
जेव्हा मुलगी माध्यमिक शिक्षण म्हणजेच इयत्ता सहावीत जाईल त्यावेळी विविध शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी रुपये सात हजार रुपये दिले जातील. आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एकूण आठ हजार रुपये दिले जातील.
इयत्ता अकरावी:
उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एकूण आठ हजार रुपये दिले जातील.एकूणच मुलीचे प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एकूण 26,000 रुपयांची तरतूद या योजनेद्वारे केली जाणार आहे.
मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर:
सर्वात महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा म्हणजे इयत्ता बारावी नंतरचे शिक्षण. गरिबीमुळे राज्यातील ग्रामीण भागातील बरेचसे पालक आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊ शकत नाही. परिणामी त्यांचे शिक्षण थांबवावे लागते,आणि तिच्या कमी वयातच तिचे लग्न लावून दिले जाते. या अडचणींमुळे तिला उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. या गोष्टीचा विचार करून मुलीच्या उच्च शिक्षणाचा सगळा भार हा राज्य सरकार उचलणार आहे. तिला उत्तम प्रकारचे उच्च शिक्षण घेता यावे यासाठी तब्बल 75 हजार रुपयांचे आर्थिक तरतूद लेक लाडकी योजनेमार्फत केली जाणार आहे.
मुलीचे वय | मिळणारी रक्कम |
मुलीचा जन्म झाल्यानंतर | 5000/- रुपये |
इयत्ता पहिली | 6000/-रुपये |
इयत्ता सहावी | 7000/-रुपये |
इयत्ता अकरावी | 8000/-रुपये |
मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर | 75000/-रुपये |
यामुळे मुलींना उच्च शिक्षण घेणे सोपे जाणार आहे.राज्यातील प्रत्येक मुलगी उच्चशिक्षित होऊन त्यांना नवनवीन रोजगार संधी मिळतील यातून त्या स्वावलंबी होतील. यामुळे त्या स्वतःसोबत आपल्या कुटुंबाला देखील आर्थिक उन्नती कडे घेऊन जातील. एकूणच याचा फायदा राष्ट्राची उन्नती होण्यास होईल.
नियम व अटी.
(Terms and condition Lek Ladki Yojana Maharashtra 2024)
‘लेक लाडकी योजना’ अंतर्गत काही नियम व अटी आहेत. जो या अटींची पूर्तता करेल तोच या योजनेचा लाभ घेऊ शकेल.आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या आधारावर पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारकांना/शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये , इयत्ता पहिलीत 6000 रुपये, इयत्ता सहावीत 7000 रुपये, अकरावीत 8000 रुपये आणि उर्वरित रक्कम 75000 रुपये लाभार्थी मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. याप्रमाणे एकूण रुपये101000/- एवढी रक्कम लाभार्थी मुलीला मिळणार आहे.
- लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका असणाऱ्या कुटुंबातील जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना तिचा जन्म 1 एप्रिल 2023 रोजी आणि त्यानंतर झालेला असणे आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ मिळेल.
- पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करण्याच्या वेळी आई किंवा वडिलांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- जर दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळ्या आपत्ती जन्माला आले तर अशावेळी एक मुलगी किंवा दोन्ही मुली असतील तेव्हा या योजनेच्या लाभ घेता येणार आहे. पण येथे मात्र माता पित्याचे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे बँक खाते हे महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- लाभ मिळणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावे.
लेक लाडकी योजना लाभ घेण्याची कार्यपद्धती
- या योजनेच्या लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी आणि त्यानंतर जन्म झालेल्या पाल्यांची जन्माची नोंदणी संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रांमधील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत करावी.
- संबंधित परिसरातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज करावा.
- योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज, प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय आयुक्त महिला बालविकास यांच्या कार्यालयात उपलब्ध होतील.
- आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडून योजनेचा अर्ज भरून घ्यावा आणि जमा करावा.
- अंगणवाडी सेविकेकडून कडून तो अर्ज पुढे अंगणवाडी पर्यवेक्षिका/मुख्य सेविका त्यांच्याकडे जमा केला जातो
- पुढे तो संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे जातो. शेवटी तपासणी करून लाभार्थी यादी ला मान्यता देण्यात येते.
- जर अर्ज भरताना कुठले कागदपत्र जमा करायचे राहून गेले असल्यास अर्जदाराने एक महिन्याच्या आत तो कागद माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जमा करावा.
आवश्यक कागदपत्रे.
(Document Required for Lek Ladki Yojana Maharashtra 2024)
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाकडे कागदपत्रांची आवश्यकता आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे त्यांना जमा करावी लागणार आहेत.
- लाभार्थ्याच्या आधार कार्ड.( पहिल्या हप्त्यावेळी शिथिलता दाखवण्यात येईल.)
- लाभार्थीचा जन्माचा दाखला.
- उत्पन्नाचा दाखला-घरातील प्रमुख व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक असेल. एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे. उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांच्याकडून मिळवलेला असावा.
- बँक पासबुक
- रेशन कार्ड- लाभार्थी कुटुंबाचे रेशन कार्ड हे पिवळ्या किंवा केशरी रंगाचे असावे. श्वेतपत्रिका असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- मतदान ओळखपत्र-लाभार्थी मुलीचे अठरा वर्षे पूर्ण हवे. मतदान यादी त्या मुलीचे नाव असायला पाहिजे
- शाळेचे बोनाफाईड- शैक्षणिक वर्षात लाभ घेण्याकरिता ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेचे बोनाफाईड.
- कुटुंब नियोजन प्रमाणपत्र.
- शेवटच्या हप्त्यावेळी लाभार्थी अविवाहितअसल्याबाबतचे स्वघोषणापत्र सादर करणे. लाभाचा शेवटचा हप्ता घेता वेळेस लाभार्थी मुलगी ही अविवाहित असणे आवश्यक आहे.
Lek Ladki Yojana Pdf Download
लेक लाडकी योजनेबाबत महत्त्वाच्या गोष्टी
- लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विशिष्ट टप्प्यांमध्ये देण्यात येणारी लाभ स्वरूपात रक्कम ही थेट लाभार्थी हस्तांतर(DBT) द्वारे देण्यात येईल.
- लाभार्थ्याचे बँक खाते हे कुठल्या बँकेत उघडावे हे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात येईल.
- संबंधित बँक खाते हे लाभार्थी व माता यांच्या नावे संयुक्त बँक खाते असणे आवश्यक आहे.
- जर मातेचा मृत्यू झाला असल्यास लाभार्थी व पिता यांचे संयुक्त बँक खाते उघडावे.
- अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळा www.maharashtra.gov.in ला भेट द्या.
माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे सुधारित स्वरूप लेक लाडकी योजना आहे.
उत्पन्न 1 एक लाखापेक्षा जास्त नसावे.
101000 रुपये
पिवळे व केशरी शिधापत्रिका/राशन कार्ड आहे ती कुटुंब या योजनेसाठी पात्र होऊ शकतील.
होय.
मुलींचे सक्षमीकरण करणे हा लेक लाडकी योजना सुरू करण्यामागील महाराष्ट्र सरकारचा उद्देश आहे.
नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या