Central Bank of India Apprentice Vacancy 2024
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने अप्रेंटिस ऍक्ट नुसार चालू आर्थिक वर्ष 2024-25 करिता Central Bank of India Apprentice Vacancy 2024 मध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झाली असून अर्ज करण्यासाठीची शेवटची दिनांक 6 मार्च 2024 आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा.
Central Bank of India Apprentice Vacancy 2024
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI )बद्दल थोडक्यात माहिती
Central Bank of India ही भारतात स्थापन झालेली सर्वात पहिली व्यावसायिक बँक आहे.CBI ही भारतातील सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात आघाडीवर असणारी बँक आहे. या बँकेच्या संपूर्ण भारतभर 4,500 पेक्षा जास्त शाखा आहेत. ज्याचे एकूण भाग भांडवल 6 लाख कोटींहून अधिक आहे.भारतातील नामवंत बँक म्हणून एक वेगळीच ओळख आहे
जाहिरात क्रमांक: –
पदाचे नाव: Central Bank of India Apprenticeship 2024
एकूण पद संख्या : 3000.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा-CLICK HERE.
Central Bank of India Apprentice Vacancy 2024 Notification Pdf
सेंट्रल बँक ऑफ इंडिया नेअप्रेंटिस पदाबाबत माहिती देणारे PDF जाहीर केले आहे. यामध्ये एकूण 3000 पदाची भरती केली जाणार आहे. पदाबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील PDF डाऊनलोड करावे.
Central Bank of India Apprentice 2024 Vacancy PDF Download.
Central Bank of India Apprentice 2024 Vacancy Details
राज्य आणि संघशासित प्रदेश यानुसार रिक्त पदांची संख्या.
राज्य आणि संघशासित प्रदेश | रिक्त पदांची संख्या |
अंदमान आणि निकोबार | 01 |
आंध्र प्रदेश | 100 |
अरुणाचल प्रदेश | 10 |
आसाम | 70 |
बिहार | 210 |
चंदिगड | 11 |
छत्तीसगड | 76 |
दादरा आणि नगर हवेली व दीव दमण | 03 |
दिल्ली | 90 |
गोवा | 30 |
गुजरात | 270 |
हरियाणा | 95 |
हिमाचल प्रदेश | 26 |
जम्मू आणि काश्मीर | 08 |
झारखंड | 60 |
कर्नाटक | 110 |
केरला | 87 |
लडाख | 02 |
मध्यप्रदेश | 300 |
महाराष्ट्र | 320 |
मणिपूर | 08 |
मेघालय | 05 |
मिझोरम | 03 |
नागालँड | 08 |
ओडिसा | 80 |
पुद्देचेरी | 03 |
पंजाब | 115 |
राजस्थान | 105 |
सिक्कीम | 20 |
तामिळनाडू | 142 |
तेलंगणा | 96 |
त्रिपुरा | 07 |
उत्तर प्रदेश | 305 |
उत्तराखंड | 30 |
पश्चिम बंगाल | 194 |
सदर रिक्त जागांमध्ये बदल करण्याचा अधिकार संपूर्णपणे बँकेकडे राहील.
Central Bank of India Apprentice 2024 शैक्षणिक पात्रता
Central bank of India ने Apprentice या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खालील शैक्षणिक निकष ठरवले आहे उमेदवारांनी खालील निकष वाचावेत. खालील शैक्षणिक निकष पूर्ण होत असतील तरच उमेदवारांनी अर्ज करावा.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Central bank of India Apprentice | 1.उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची व कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. 2.केंद्र सरकारची मान्यता असलेली कोणतेही समकक्ष पात्रता पूर्ण केलेली असावी. 3.31/03/2020 नंतरच उमेदवाराचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा. 4.Apprentice या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पदवी पास झाल्याचे प्रमाणपत्र असावे. 5.स्थानिक भाषेचे (local language) ज्ञान असायला हवे |
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म1-4-1996 ते 31-3-2004 दरम्यान झालेला असावा. म्हणजे उमेदवाराचे वय 27 पेक्षा जास्त नसावे. शासन निर्णयानुसार वयामध्ये जातीनिहाय सूट खालील प्रमाणे देण्यात आली आहे. याबाबतची माहिती खालील तक्त्या मध्ये देण्यात आली आहे.
वय गणक यंत्र : येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.
प्रवर्ग | वयामध्ये सवलत |
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती(SC/ST) | 5 वर्ष |
इतर मागासवर्गीय (Non Creamy Layer) | 3 वर्ष |
अपंग व्यक्ती | 10 वर्ष |
1984 च्या दंगलीने पीडित व्यक्ती | 5 वर्ष |
विधवा स्त्रिया, घटस्फोटित स्त्रिया, कायद्याने पतीपासून वेगळ्या झालेल्या स्त्रिया आणि ज्यांनी पुन्हा लग्न केले नाही अशा स्त्रिया | खुला वर्ग/EWS प्रवर्गासाठी 35 वर्षापर्यंत, OBC प्रवर्गासाठी38 वर्षापर्यंत, आणि अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी 40 वर्षापर्यंत सवलत |
Central Bank of India Apprentice Vacancy 2024 परीक्षा फीस
CENTRAL BANK OF INDIA या पदासाठी परीक्षा फीस ही ऑनलाईन भरावयाची आहे. हि फीस Non-Refundable असणार आहे. ऑनलाईन परीक्षा फीस ही खालीलप्रमाणे आकारली जाईल. परीक्षा फीस पूर्ण भरली असेल तरच अर्ज स्वीकारले जातील याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
पदाचे नाव | खुला प्रवर्ग (Open Category) | मागास प्रवर्ग, सर्व महिला उमेदवार /EWS | PWBD उमेदवार |
Central bank of India Apprentice | 800 RS/- + GST | 600 RS/- +GST | 400 RS/-+GST |
पगार
CENTRAL BANK OF INDIA APPRENTICE मध्ये निवडल्या गेलेल्या उमेदवारांना मध्ये खालील प्रमाणे दरमहा स्टायपेंड देण्यात येईल. त्याची खालील तक्त्यात माहिती दिली आहे. CBI मध्ये प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ म्हणून निवड झालेल्या उमेदवारास दरमहा एक विशिष्ट रक्कम दिली जाईल.
मेट्रो शाखा | 15000/- रुपये |
शहरी शाखा | 15000/- रुपये |
ग्रामीण आणि निमशहरी शाखा | 15000/- रुपये |
पगारा व्यतिरिक्त महागाई भत्ता किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा लाभ प्रशिक्षणार्थ्याला मिळणार नाही. प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याचा कालावधी हा एक वर्ष राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Central Bank of India Apprenticeship 2024 निवड प्रक्रिया
सर्वप्रथम उमेदवारांनी विहित नमुन्यातील आपला अर्ज सर्व कागदपत्रांसहित सादर करावा.परीक्षा फी जमा करून अर्ज सबमिट करावा. पूर्ण अर्ज आणि परीक्षा फीस भरलेल्या उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी बोलावण्यात येईल.1. ऑनलाइन परीक्षा
- ऑनलाइन परीक्षा -सदरील अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उमेदवाराची ऑनलाइन परीक्षा होईल. ऑनलाइन परीक्षेच्या गुणांवर त्यांची गुणवत्ता यादी (Merit List) लावली जाईल. ज्या उमेदवारांचे नाव गुणवत्ता यादीत असेल त्याला पुढील टप्प्यात जाता येईल.
- Local Language Proof
- उमेदवाराची आपल्या स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान असावे. म्हणजेच उमेदवाराला आपली स्थानिक भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.
- उमेदवार इयत्ता आठवी दहावी बारावी यापैकी एका इयत्तेत स्थानिक भाषा या विषयासहित उत्तीर्ण असावा.
- अंतिम निवड ऑनलाइन परीक्षेच्या गुणांवर करण्यात येईल जो उमेदवार जास्तीत जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होईल त्याची प्रशिक्षणार्थी म्हणून ग्राह्य धरले जाईल.
- मुलाखत
- ऑनलाइन परीक्षानंतर उमेदवारांचे गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. पात्र गुणांची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराला अंतिम टप्प्यात म्हणजेच मुलाखतीसाठी बोलावली जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने त्यांचे ऑफर लेटर पाठवले जाईल.
- मुलाखती वेळी उमेदवारांनी जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या प्रादेशिक कार्यालयात आपल्या ऑफर लेटर समवेत हजर राहावे.
- शेवटी सर्व अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या रुजू होण्याचे ठिकाण तसेच दिनांक याबद्दलची सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल.
- उमेदवाराने वेळोवेळी अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.
- निवड प्रक्रियेत सदर दोन्ही टप्प्यांव्यतिरिक अन्य इतर प्रकारचे निकष ठरविण्याचा अधिकार हा संपूर्णपणे बँकेला आहे.
SYLLABUS FOR CENTRAL BANK OF INDIA APPRENTICE 2024
- Quantitative Aptitude
- General English
- Reasoning and Complete Knowledge.
- Basic Retail Liability Products
- Basic Retail Asset Products
- Basic Investment Products
- Basic Insurance Products
Central Bank of India Apprentice Vacancy 2024 महत्त्वाच्या तारखा
खालील तक्त्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत महत्त्वाच्या तारखा देण्यात आले आहे. यामध्ये परीक्षेची जाहिरात, परीक्षेसाठी नोंदणी तसेच परीक्षा दिनांक याबाबत माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक खालील तक्ता अभ्यासावा.
परीक्षेची जाहिरात | 21 फेब्रुवारी 2024 |
Registration Start Date | 21 फेब्रुवारी 2024 |
Registration End Date | 27 मार्च 2024 |
परीक्षा दिनांक संभाव्य | 10 मार्च 2024 |
How To Apply Central Bank Of India Apprentice 2024
- अर्जदाराने सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत Apprenticeship with Central Bank of India स्थळाला भेट देऊन लगेच अर्ज करा यावर क्लिक करावे.
- Registration – सर्वप्रथम अर्जदाराला आपले रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
- त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन (NEW REGISTRATION) वर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी विचारलेली आपली प्राथमिक माहिती भरायची आहे. जसे की आपला व्हॅलिड ईमेल आयडी, चालू मोबाईल नंबर, आधार कार्ड , आपली पोटजात इ. संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट केल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
- Login – दुसऱ्या टप्प्यात लॉगिन बटनावर क्लिक करून आपल्या मोबाईल नंबर वर आलेल्या युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे. या ठिकाणी उमेदवाराने आपली सविस्तर माहिती भरायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यावर शेवटी ट्रेनिंग प्रेफरन्स निवडावा.
- सर्वात शेवटी परीक्षा फी भरून फॉर्म सबमिट करावा.
FREQUENTLY ASKED QUESTION
Ans: CENTRAL BANK OF INDIA ने अप्रेंटिस पदांच्या एकूण 3000 जागांची भरती जाहीर केली आहे.
Ans: अप्रेंटिस पदासाठी महाराष्ट्रासाठी एकूण 320 जागा सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने उपलब्ध करून दिल्या आहेत?
Ans:CENTRAL BANK OF INDIA चा अप्रेंटिस पदाचा कार्यकाल 12 महिने असणार आहे
Ans:उमेदवारांना दरमहा 15000 रुपये वेतन मिळणार आहे.
Ans:सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी 21 फेब्रुवारी पासून 27 मार्च 2024 पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.