IPPB EXECUTIVE VACANCY 2024
IPPB EXECUTIVE VACANCY 2024 : इंडियन पोस्ट पेमेंट बँके पदवीधारकांसाठी नोकरीची संधी आणली आहे. यामध्ये एकूण 47 पदांची भरती केली जाणार आहे.पदवीधारक या पदांसाठी 15 मार्च 2024 पासून 5 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज भरू शकतात. या संधीचा फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज भरा.
INDIAN POST PAYMENT BANK EXECUTIVE VACANCY 2024
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेबद्दल थोडक्यात माहिती
ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक सेवा पुरविण्याचा मूळ हेतू लक्षात घेऊन भारतीय डाक विभागामार्फत IPPB (INDIAN POST PAYMENT BANK )ची स्थापना केली गेली आहे.पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारच्या मालकीचे आहे.याचा उद्देश भारतातील सर्व पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना तीन लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या मदतीने घरोघरी बँकिंग सेवा AN पुरविणे हा आहे.या बँकिंग सेवांचा फायदा शहरी तसेच ग्रामीण भागात एकूणच देशाच्या कानाकोपऱ्यातील देशवासीयांना होणार आहे.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा उद्देश
- मुख्यत्वे करून सर्वसाधारण व्यक्ती, छोटे व्यवसाय तसेच व्यापारी वर्गाला बँकिंग सेवा पुरविण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून IPPB ची स्थापना करण्यात आले आहे.
- यामध्ये बचत खाते, चालू खाते, मोबाईल तसेच सर्व प्रकारचे रिचार्ज, कर्ज, विमा, गुंतवणूक, पोस्ट ऑफिस बचत योजना इत्यादी सेवांचा समावेश असणार आहे.
या सेवांमध्ये भविष्यात होणारी वाढ लक्षात घेऊन IPPB मार्फत पात्र आणि कामाप्रती एकनिष्ठ उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.या पदांमध्ये विक्री आणि ऑपरेशन विभागाच्या विविध शाखांचा समावेश असणार आहे.
सदर भरती कंत्राटी पद्धतीने असून पात्र उमेदवाराचे कार्यकारी (Executive) पदावर नियुक्ती केली जाईल.
जाहिरात क्रमांक: IPPB/CO/HR/RECT./2023-24/06
पदाचे नाव : कार्यकारी (Executive)
एकूण पद संख्या : 47
Online अर्ज सुरुवात दिनांक : 15-03-2024
Online अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 05-04-2024
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : CLICK HERE TO APPLY ONLINE
अधिक माहितीसाठी पुढील पीडीएफ डाउनलोड करा : CLICK HERE TO DOWNLOAD PDF
IPPB EXECUTIVE VACANCY DETAILS 2024
रिक्त जागांची संख्या तात्पुरत्या स्वरूपाची आहे, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार IPPB आला असणार आहे.
राज्यानुसार पदसंख्या :
राज्य | रिक्त जागांची संख्या |
बिहार | 05 |
दिल्ली | 01 |
गुजरात | 08 |
हरियाणा | 04 |
झारखंड | 01 |
कर्नाटक | 01 |
मध्य प्रदेश | 03 |
महाराष्ट्र | 02 |
ओडिसा | 01 |
पंजाब | 04 |
राजस्थान | 04 |
उत्तर प्रदेश | 11 |
एकूण | 47 |
- उमेदवार हा कोणत्याही एका राज्यात आपला फॉर्म भरू शकतो. एकापेक्षा जास्त राज्यात फॉर्म भरता येणार नाही.
- प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल.
- गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना त्यांनी ज्या राज्यासाठी फॉर्म भरला होता त्याच राज्यात त्यांची नियुक्ती केली जाईल.
- उमेदवारांना ज्या राज्यात काम करायचे आहे त्याच राज्यात त्यांनी आपला फॉर्म भरावा.
IPPB EXECUTIVE EDUCATION CRITERIA
- अर्जदार उमेदवाराने आपली पदवी अभ्यासिका पूर्ण केलेली असावी म्हणजे उमेदवार पदवीधर असावा.
- सदर पदवी कुठल्याही विभागाचे असली तरी चालेल.
- जर एखाद्या उमेदवाराचे पोस्ट ग्रॅज्युएशन MBA (Sales/Marketing) झाले असेल, अशा उमेदवारांना पहिली पसंती देण्यात येईल.
- सदर पदासाठी कुठल्याही प्रकारच्या कामाच्या अनुभवाची गरज नाही.
IPPB EXECUTIVE 2024 JOB DESCRIPTION
Position | Job Description | Minimum Eligibility Criteria |
Executive | • Achievement of Monthly revenue targets through direct sales of Bank’s products | Minimum Educational Qualification: Graduate in any discipline Note: First preference will be given to candidate with MBA(Sales/Marketing). Post qualification work |
• Support in organizing customer acquisition events and run campaigns in the area under Branch/ Office jurisdiction to increase financial literacy. | ||
• Conduct periodic training and education sessions for GDS on IPPB products and services. | Experience: Fresher Note: The candidate with prior experience in sales/operations of financial products will be desirable | |
• Operate seamlessly with DoP Inspectors (Sub-division) and Postmasters to drive IPPB and 3rd Party sales. | ||
• Assist GDS in acquiring new customers for IPPB and its Partner Organizations. Assist IPPB Manager in Operations | ||
• Acquire, grow and retain customer relationships by organizing customer events and run campaigns in the area to increase financial literacy | ||
• Develop and manage the strategic relationship with all channel partners to drive sales and disseminate marketing information, events, training and promotions which will facilitate meeting the Bank’s business goals. Any other duties assigned by the Bank from time to time. |
IPPB EXECUTIVE VACANCY AGE LIMIT
इंडियन पोस्ट पेमेंट बँक याचा अर्ज भरताना वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
जातीनिहाय सूट देण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे असेल.
वय गणक यंत्र : येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.
Category | Age Relaxation |
SC/ST | 5 Year |
OBC | 3 Year |
PWD UR | 10 Year |
PWD OBC | 13 Year |
PWD SC/ST | 15 Year |
IPPB EXECUTIVE VACANCY 2024 EXAM FEES
इंडियन पोस्ट बँकेसाठी भरावयाची परीक्षा फीस हे पुढील प्रमाणे आहे. प्रवर्गानुसार ही परीक्षा फीस भरली जाणार आहे.सदर परीक्षा फीस ही फक्त ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येईल, अन्य कुठल्याही स्वरूपात फीस स्वीकारले जाणार नाही.एकदा भरलेली फीस कोणत्याही कारणाशिवाय परत भेटणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. (Non Refundable)
Category | Exam Fees |
SC/ST | 150 Rs/- |
Remaining All Category | 750 Rs/- |
IPPB EXECUTIVE CONTRACT DURATION 2024
- IPPB नेट ठरविलेल्या पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड करून त्यांचे कार्यकारी म्हणून नियुक्ती केली जाईल.
- सुरुवातीला त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ एक वर्ष असेल. पहिले वर्ष पूर्ण केल्यानंतर पुढील एक वर्ष वाढवून मिळेल.
- शेवटी उमेदवाराच्या कामाची दखल घेऊन आणखीन एक वर्ष कार्यकाळ वाढवून मिळेल.
- म्हणजे कामावर रुजू झाल्यानंतर तिथून पुढे तीन वर्ष कार्यकारी म्हणून पदावर काम करता येईल.
IPPB EXECUTIVE SALARY STRUCTURE
इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये कार्यकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला दरमहा 30,000 रुपये एवढी रक्कम दिली जाईल.
याव्यतिरिक्त उमेदवाराला कुठल्याही प्रकारचे भत्ते किंवा बोनस दिला जाणार नाही.
SELECTION PROCESS OF IPPB EXECUTIVE VACANCY 2024
- उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर जमा झालेल्या सर्व अर्जांची छाननी केली जाईल. पात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात बोलावले जाईल.
- उमेदवाराच्या निवड प्रक्रियेत पदवीमध्ये प्राप्त गुण, Group Discussion, Personal Interview या बाबींचा समावेश असेल.
- पदवी अभ्यासक्रमात मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारावर देखील अंतिम निवड करण्याचा सर्वस्वी अधिकार हा IPPB ला असणार आहे.
- याव्यतिरिक्त ते ऑनलाईन परीक्षा, Group Discussion या पद्धतीचा देखील वापर करू शकतात.
- पदवी अभ्यासक्रमात मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना Personal Interview, Group Discussion, Online Test यासाठी बोलावले जाऊ शकते.
- समान गुण घेणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या जन्मतारखेवरून अंतिम निवड केली जाईल.
HOW TO APPLY FOR IPPB EXECUTIVE VACANCY 2024
ज्या उमेदवारांना इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी खालील माहितीचा उपयोग करून अर्ज भरायचा आहे.
- . सर्वात प्रथम IPPB च्या अधिकृत संकेतस्थळ IPPBONLINE.COM ला भेट द्यावी.
- तेथे Media/Announcement ला Click करावे.
- Career नावाच्या पर्यायाला क्लिक करा.
- पुढे “Recruitment of 47 circle-based Executives on contract basis” ला Click करा.
- नवीन अर्जदाराने सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन Registration प्रक्रिया पूर्ण करावी.
- Registration पूर्ण झाले असेल तर Log in करून पुढे form भरावा.
- प्रवर्गानुसार फॉर्म आणि फीस भरून पुढे Form Submit करावा.
IPPB EXECUTIVE VACANCY 2024 GENERAL INSTRUCTION
उमेदवारांसाठी सूचना
- उमेदवाराने मिळविलेली पदवी नियमित आणि पूर्णवेळ अभ्यासक्रम असायला हवी.
- अर्ज भरत असताना उमेदवारांनी आपली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून भरावी, अपूर्ण माहिती असल्यास फॉर्म बात केला जाईल.
- अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच करावा, अन्य इतर कुठल्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- फॉर्म भरताना दिलेली माहिती आणि उमेदवाराची मूळ माहिती यांच्यात काही तफावत आढळल्यास त्याच ठिकाणी सदर उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर पडेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- त्यामुळे उमेदवारांनी फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर दिलेली माहिती अचूक आहे याची खात्री करावी.
- पात्रतेच्या बाबतीत कुठलेही प्रकारचा वाद निर्माण झाल्यास त्या ठिकाणी IPPB चा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.
- सदर भरती प्रक्रिये बाबत सर्व पत्र व्यवहार हा आपल्या मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी द्वारे होणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी फॉर्म भरतेवेळी आपला चालू मोबाईल नंबर आणि व्हॅलिड ईमेल आयडी द्यावा.
- भरती बद्दल महत्त्वाच्या तारखा, सूचना इत्यादी माहितीसाठी उमेदवाराने वेळोवेळी IPPB च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.
- प्रवेश पत्र, मुलाखत कॉल लेटर इत्यादीअधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट घ्यावी, सदर गोष्टी पोस्टद्वारे पाठवले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तसेच भरती बाबत इतर माहितीसाठी careers@ippbonline.in यावर मेल करावा.
ANS- इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने एकूण 47 पदांसाठी भरती जाहीर केली आहे
ANS-दरमहा 30 हजार रुपये.
नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या.
महाराष्ट्रातील योजना: