Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना शिंदे सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. राज्यातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. तरी लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांनी Mukhymantri Vayoshri Yojana 2024 या योजनेचा लाभ घ्यावा.
महाराष्ट्रात 2011 साली झालेल्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे एकूण लोकसंख्या 11 कोटी 24 लाख इतकी आहे. त्यांच्यापैकी आत्ताच्या घडीला 65 वर्ष व त्याहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची टक्केवारी 10 ते 12 टक्के इतके आहे.सर्वांना माहीतच असेल की वृद्ध लोकांना त्यांच्या दररोजच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अपंगत्वाचा सामना करावा लागतो.केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील असलेल्या दुर्बल अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अपंगत्व नुसार आयुष्य सोपे करण्यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजना (Rashtriya Vayoshri Yojana) सुरू केली आहे.
अशा ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी केंद्र सरकारकडून त्यांना काही उपकरणे देण्यात येतात तसेच त्यांचे मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी सेवा पुरविण्यात येतात.
शासनाने जाहीर केलेला निर्णय
राज्यातील ज्या नागरिकांचे वय 65 वर्षे व त्यापेक्षा अधिक आहे अशा नागरिकांना सामान्य माणसांप्रमाणे जीवन जगता यावे तसेच वय वाढल्यावर येणारेअपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी उपकरणे पुरवणे. त्या ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य सुस्थितीत राहण्यासाठी मनस्वास्थ केंद्रे आणि योगो उपचार केंद्रे यांची व्यवस्था करणे यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याचा निर्णय माननीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना(Mukhyamantri Vayoshri Yojana 2024)
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेमार्फत राज्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मिळणार तब्बल रुपये 3,000 आर्थिक मदत. या योजनेचे फायदे कुठले आहेत ? सदर योजनेच्या लाभासाठी अर्ज कुठे व कसा करायचा? याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे. खाली दिलेली माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा आणि लगेच अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेचे उद्दिष्ट
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदतीचा हात
- लाभ : रुपये 3000 एवढी आर्थिक मदत
- लाभार्थी : महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी
- वयाची अट:अर्जदार हा 65 वर्षांपुढील असावा
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन ऑफलाइन
मुख्यमंत्री वयोश्री योजना फायदे
राज्यातील ज्येष्ठ नागरिकाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर होईल, या ठिकाणी आर्थिक मदती सोबतच आणखीन बऱ्याच गोष्टींचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभार्थी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यात रुपये 3,000 एवढी रक्कम थेट लाभ वितरण (DBT) द्वारे थेट बँक खात्यात जमा होणार आहे.
संबंधित खाते हे राष्ट्रीयकृत बँकेचे असावे आणि बँक खात्याशी आधार लिंक आहे याची खात्री लाभार्थ्याने करावी. संबंधित आर्थिक मदत ही ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार येणारा अशक्तपणा, अपंगत्व, शारीरिक हानी यावर उपाय योजनेसाठी आवश्यक तेवढे साहित्य खरेदीसाठी तसेच मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी, जीवनमान सुधारणा आणण्यासाठी राज्यात ही योजना राबवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारे मिळणारे साहित्य
या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रुपये 3,000 ची आर्थिक मदत ही वयोवृद्धांना लागणारी संबंधित उपकरणे खरेदी करिता असणार आहेत. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT प्रणाली द्वारे थेट खात्यात जमा होणार आहे.
- चष्मा
- श्रवण यंत्र
- फोल्डिंग वॉकर
- कमोड खुर्ची
- सर्वाइकल कॉलर
- नि-प्रेस
- ट्रायपॉड
- स्टिक व्हील चेअर
- लंबर बेल्ट
मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता निकष
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र शासन, या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी महाराष्ट्र सरकार द्वारे एक विशिष्ट नियमावली ठरविण्यात आली आहे. जी व्यक्ती सदर पात्रता पूर्ण करेल तीच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
- संबंधित ज्येष्ठ नागरिक हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील ज्येष्ठ नागरिकाचे वय 31.12.2023 पर्यंत 65 वर्षे पूर्ण असावे.
- ज्या व्यक्तींचे 65 वर्षे पूर्ण आहे अशा व्यक्तींकडे आधार कार्ड असावे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा किंवा आधार नोंदणीची पावती असावी
- आधार कार्ड नसेल त्यांनी स्वतःची ओळख पटविण्यासाठी स्वतंत्र ओळखपत्र सादर करावेत.
- ज्या लाभार्थ्यांच्या बँकेत 3000 रुपये जमा झाले आहे त्यांनी
- योजनेअंतर्गत सुचवलेली उपकरणे
- मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे बिल सादर करावे. ते बिल 30 दिवसांच्या आत सहाय्यक आयुक्त, कल्याण यांच्या कडून प्रमाणित करून विकसित पोर्टलवर अपलोड करावे अन्यथा लाभार्थीकडून पूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल.
- ज्या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये लाभ घेणाऱ्यांपैकी 30 टक्के महिलांचा समावेश असणार आहे
योजनेची अंमलबजावणी
या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्हास्तरावर वेगवेगळ्या यंत्रणा कार्यान्वित करण्यात आले आहेत. यांच्याकडून लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे त्यामध्ये लाभार्थ्याकडून लागणारी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे त्यांचा आधार क्रमांक बँक खाते याबद्दलची माहिती गोळा केली जाणार आहे ही कामे नोडल एजन्सी आणि केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त आणि जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.
महानगरपालिकाक्षेत्र
अध्यक्ष | आयुक्त महानगरपालिका |
सदस्य | वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका, महिला व बालविकास अधिकारी |
सदस्य सचिव | सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण |
अध्यक्ष | जिल्हाधिकारी |
सहअध्यक्ष | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद |
सदस्य | जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग सहसंचालक समकक्ष अधिकारी, महिला व बालविकास |
सदस्य सचिव | सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी |
मुख्यमंत्री वयोश्री योजना आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक
- ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- स्वयंघोषणापत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज भरताना वरील सर्व कागदपत्रे सादर करायची आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज कसा करावा.
(How to apply for Mukhyamantri Vayoshri Yojana 2024?)
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र सरकार मार्फत सुरू करण्यात आली आहे. ही योजना राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धरतीवर तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना विविध लाभ मिळणार आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी महाराष्ट्र सरकार द्वारे नवीन स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात येणार आहे, ज्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. काही दिवसातच त्याची प्रक्रिया पूर्ण होईल. राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धरतीवर ही योजना सुरू करण्यात आली असल्यामुळे अर्ज करण्याची पद्धत सारखीच असणार आहे. तुम्ही देखील ही पद्धत वापरून योजनेसाठी अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज भरताना
- सर्वात अगोदर तुम्हाला अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यायची आहे
- संकेतस्थळावर गेल्यावर मुख्यमंत्री वयोश्री योजना Apply Online वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
- फॉर्म भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक आणिअचूक भरायची आहे.
- फॉर्म भरतेवेळी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करायची आहे.
- सर्वात शेवटी अर्ज पूर्ण भरून झाल्यावर फॉर्म सबमिट करावा.
ऑफलाइन अर्ज भरताना
- जिल्हा सामाजिक न्याय कार्यालयात जावे.
- संबंधित योजनेचा फॉर्म घ्यावा.
- फॉर्म काळजीपूर्वक भरून घ्यावा.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करावी.
- शेवटी अर्ज जमा करावा.
दिलेली माहिती चुकीची आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल हे अर्जदाराने लक्षात घ्यावे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली असून निधीची देखील तरतूद केली गेलीआहे.याचा शासन निर्णय (जीआर) प्रसिद्ध झाला आहे, परंतु याचे स्वतंत्र पोर्टल सुरू करण्याचे काम अद्याप चालू आहे. जेव्हा हे पोर्टल सुरू होईल तेव्हा सदर योजनेसाठी अर्ज कसा करावा? कुठे करावा? याबद्दल सविस्तर माहिती आमच्याकडून या लेखामध्ये अपडेट करण्यात येईल. त्यासाठी आमच्या संकेतस्थळाला https://naukarigatha.com/yojana/ भेट द्या.
योजना PDF: Download Mukhyamantri Vayoshri Yojana PDF
Frequently Asked Question
6 फेब्रुवारी 2024
अर्जदाराचे वय 65 वर्षे पूर्ण असावे.
एकूण 3,000 रुपये
ऑनलाइन/ऑफलाइन दोन्ही प्रकारे.
दोन लाखांपेक्षा कमी.