Mumbai Home guard Vacancy 2025- मुंबई महानगरपालिकेत दहावी पास उमेदवारांना होमगार्ड या पदासाठी अर्ज करता येणार आहे. यामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोघे देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. या भरतीमध्ये एकूण पदे 2771 इतकी आहेत. भरतीची प्रक्रिया सध्या चालू आहे. उमेदवार ऑनलाईन पद्धतीने यासाठी आपला अर्ज करू शकतात. या भरतीसाठी लागणाऱ्या सर्व अटी,शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबद्दल सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे.

जाहिरात क्रमांक–
एकूण पदसंख्या– 2771
ऑनलाइन अर्ज सुरुवात दिनांक– 27 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची दिनांक– 10 जानेवारी 2025
ऑनलाइन अर्ज- Click Here To Apply Online
Mumbai Home guard Vacancy 2025 Notification Pdf
मुंबई महानगरपालिकेने एकूण 2771 पदांची होमगार्ड भरती जाहीर केली आहे. याबाबतची तपशीलवार माहिती देणारे पीडीएफ पुढे देण्यात आले आहे. उमेदवारांनी दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. आणि सर्व अटींची पूर्तता होते किंवा नाही याचे खात्री करूनच अर्ज दाखल करावा.
होमगार्ड संघटनेचा उद्देश-भारतातील लोकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे शिक्षण देणे. देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची शिक्षण देणे. होमगार्ड संघटनेचा मुख्य उद्देश देशातील नागरिकांना शिस्तप्रिय बनवणे हा आहे.
होमगार्ड मध्ये निवड झालेल्या सदस्यांचे कर्तव्य- निवड झालेल्या उमेदवारांना दररोज काम दिले जात नाही. पोलीस दलाची मागणी असेल तरच होमगार्ड रक्षकांना तैनात करण्यात येते.पुढील अटीतटीच्या प्रसंगांमध्ये होमगार्ड रक्षकांची गरज भासते.
1. पोलीस दलासोबत बंदोबस्त कार्य
2. अग्निशमन
3. विमोचन
4. पूर परिस्थिती
5. रोगराई
6. महामारी
7. कामगारांचा संप
अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस दलासोबत अतिरिक्त फौज फाटा म्हणून होमगार्ड रक्षकांची गरज भासते.
Mumbai Home guard Salary 2025
मुंबई महानगरपालिकेकडून पुढील प्रमाणे देय व भत्ता दिला जातो.
निवड झालेल्या उमेदवारांना दिवसाला 1083-/ रुपये कर्तव्य भत्ता दिला जातो.
उपाहार भत्ता म्हणून होमगार्ड सदस्यांना 200-/ रुपये देण्यात येतात.
तसेच निवड झालेल्या सदस्यांना ट्रेनिंग मध्ये भोजन भत्ता म्हणून 250-/रुपये देण्यात येतात. खिसा भत्ता म्हणून 100-/ रुपये देण्यात येतात. दर आठवड्याला होणाऱ्या साप्ताहिक कवायतीसाठी 180-/ रुपये भत्ता दिला जातो.
Mumbai Home guard Recruitment Criteria 2025
मुंबई होमगार्ड भरतीसाठी असणारे शारीरिक शैक्षणिक नियम पुढीलप्रमाणे देण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज करताना पुढील नियमांची पूर्तता होत असेल तरच अर्ज करावा.
Education Criteria for Mumbai Home guard
1.मुंबई होमगार्ड भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हा दहावी पास असावा.
Physical Criteria for Mumbai Home guard
1.अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी वीस वर्षे पूर्ण असावे. उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 50 वर्षाच्या आत असावे.
2. उंची- पुरुष उमेदवारांकरिता उंची 162 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.
महिला उमेदवारांकरिता उंची 150 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.
3.छाती- अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवारांकरिता छाती न फुगवता 76 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. तसेच फुगवून 81 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.
Educational Certificate for Mumbai Home guard Vacancy 2025
1.उमेदवाराला जन्म दिनांक चा पुरावा म्हणून दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला द्यावा लागेल.
2. गुणवत्ता यादीत मेरिट लावण्यासाठी ज्या उमेदवारांनी तांत्रिक अहर्ता धारण केले आहे त्याबद्दलचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र जमा असेल तरच त्याचे गुण विचारून घेतले जाणार आहेत.
3. खाजगी ठिकाणी नोकरी करत असल्यास उमेदवाराला त्याच्या कंपनीकडून किंवा संबंधित मालकाकडून ना हरकत प्रमाणपत्र (No Objection certificate) घ्यावे लागेल.
4. भरती झाल्यानंतर उमेदवाराला तीन महिन्याच्या आत पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तसेच त्यासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Physical Endurance Test for Mumbai Home guard Vacancy 2025
पुरुष उमेदवार | महीला उमेदवार | ||
१६०० मी. धावणे | २० गुण | ८०० मी. धावणे | २० गुण |
५ मि. १० सेकंद किंवा त्यापेक्षाकमी | २० गुण | २ मि. ५० सेकंद किंवा त्यापेक्षाकमी | २५ गुण |
५ मि. १० सेकंदापेक्षा जास्त परंतु ५ मि. ३० सेकंदापेक्षाकमी | १८ गुण | २ मि. ५० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३मि. ००सेकंदापेक्षा कमी | २२ गुण |
५ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त परंतु५.मि. ५० सेकंदापेक्षाकमी | १६ गुण | ३मि. ००सेकंदापेक्षा जास्त ३ मि. १० सेकंदापेक्षा कमी | १८ गुण |
५ मि. ५० सेकंदापेक्षा जास्त परंतु ६ मि. १० सेकंदापेक्षा कमी | १४ गुण | ३ मि. १० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३मि. २० कमी | १४ गुण |
६ मि. १० सेकंदापेक्षा जास्त परंतु ६ मि. ३० सेकंदापेक्षा कमी | १२ गुण | ३.मि. २० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३ मि. ३० सेकंदापेक्षा कमी | १० गुण |
६ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त ६ मि. ५० सेकंदापेक्षा | १० गुण | ३ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३ मि. ४०सेकंदापेक्षा कमी | ०६ गुण |
६मि. ५० सेकंदापेक्षा जास्त परंतु ७ मि. १० सेकंदापेक्षा कमी | ०६ गुण | ३ मि. ४० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३ मि. ५० सेकंदापेक्षा कमी | ०४ गुण |
७ मि. १० सेकंदा पेक्षा जास्त परंतु ७ मि. ३० सेकंदा पेक्षा कमी | ०२ गुण | ३ मि. ५० सेकंदापेक्षा जास्त परंतु ४ मि.०० सेकंदा पेक्षा कमी | ०२ गुण |
७ मि. ३० पेक्षा जास्त | ० गुण | ४ मि.०० सेकंदा पेक्षा जास्त | ० गुण |
गोळा फेक पुरुष उमेदवारांकरिता
गोळा फेकीचे अंतर मीटर मध्ये | ||
८.५० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | ——– | १० गुण |
७.९० मीटर किंवा जास्त | ८.५० मीटर पेक्षाकमी | ०९ गुण |
७.३० मीटर किंवा जास्त | ७.९० मीटर पेक्षाकमी | ०८ गुण |
६.७० मीटर किंवा जास्त | ७. ३० मीटर पेक्षाकमी | ०७ गुण |
६. १० मीटर किंवा जास्त | ६.७० मीटर पेक्षाकमी | ०६ गुण |
५.५० मीटर किंवा जास्त | ६. १० मीटरपेक्षाकमी | ०५ गुण |
४.९० मीटर किंवा जास्त | ५.५० मीटर पेक्षाकमी | ०४ गुण |
४.३० मीटर किंवा जास्त | ४.९० मीटर पेक्षाकमी | ०३ गुण |
३.७० मीटर किंवा जास्त | ४. ३० मीटर पेक्षाकमी | ०२ गुण |
३.१० मीटर किंवा जास्त | ३.७० मीटर पेक्षाकमी | ०१ गुण |
३. १० मीटर पेक्षाकमी | ——— | ०० गुण |
गोळा फेक महिला उमेदवारांकरिता
गोळा फेकीचे अंतर मीटर मध्ये | ||
६.०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त | ———— | १० गुण |
५.५० मीटर किंवा जास्त | ६.०० मीटर पेक्षा कमी | ०८ गुण |
५.०० मीटर किंवा जास्त | ५.५० मीटर पेक्षा कमी | ०६ गुण |
४.५० मीटर किंवा जास्त | ५.०० मीटर पेक्षा कमी | ०४ गुण |
४.०० मीटर किंवा जास्त | ४.५० मीटर पेक्षा कमी | ०२ गुण |
४.०० मीटर किंवा जास्त | ——— | ०० गुण |
तांत्रिक अहर्ता
तांत्रिक अहर्ता एकुणगुण १० | अटींची पुर्तता केल्यास | गुण |
१. आय टी आय (ITI) प्रमाणपत्र धारक २. खेळामध्ये प्राविण्य मिळविलेल्या व्यक्ती. ( जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धामध्ये प्राविण्यप्राप्त) ३. माजी सैनिक (डिस्जार्जकार्ड आवश्यक) ४. एन. सी. सी. बी प्रमाणपत्र५. एन.सी.सी. सी प्रमाणपत्र६. नागरीसंरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणीतीन प्रशिक्षण पुर्णकेलेले प्रमाणपत्र धारक७. जड वाहनचालक परवाना धारक | यापैकी१ अट पुर्णकरीत असतीलतर | ०२ गुण |
यापैकी २ अट पुर्णकरीत असतीलतर | ०३ गुण | |
यापैकी ३ अट पुर्णकरीत असतीलतर | ०४ गुण | |
यापैकी ४ अट पुर्णकरीत असतीलतर | ०५ गुण | |
यापैकी ५ अट पुर्णकरीत असतीलतर | ०७ गुण | |
यापैकी ६ अट पुर्णकरीत असतीलतर | ०८ गुण | |
सर्व अटी पुर्णकरीत असतीलतर | १० गुण |
How to Apply for Mumbai Home guard Vacancy 2025
मुंबई होमगार्ड भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पद्धतीचा अवलंब करावा.
1.सर्वप्रथम उमेदवारांनी होमगार्ड विभागाच्या दिलेल्या संकेतस्थळावर जावे.
त्या संकेतस्थळावर जाऊन HGs ENROLLMENT या मेनू मधून ONLINE
ENROLLMENT FORM सब मेनू निवडावा.
2. उमेदवारांनी फॉर्म भरताना सर्वप्रथम जिल्हा निवड करावा.
3. अर्ज करताना बारा अंकी स्वतःचा आधार कार्ड नंबर व्यवस्थित भरावा.
4.अर्ज करताना लिंग,पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ईमेल आयडी ही माहिती उमेदवाराने अचूक भरावी.चुकीचा अर्ज भरल्यास तो अर्ज बाद करण्यात येईल.
5. दिलेल्या जाहिरातीप्रमाणे तांत्रिक अहर्ता निवड करावी.
6. उमेदवाराने जन्मदिनांक, उंची व्यवस्थित भरावी.
7.उमेदवार जर यापूर्वी होमगार्ड सेवेत असेल तर YES करावे. तसेच कुठल्या कारणास्तव कमी करण्यात आले आहे याबाबतचे माहिती देणारे आदेशाची प्रत सोबत जोडावी.
8. अर्ज भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट काढावी.
नवनवीन जॉब अपडेट तसेच योजनांसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ NaukariGatha.Com ला भेट द्या.
महाराष्ट्रातील योजना: