Mumbai Mahanagarpalika bharti 2024
Mumbai MahanagarPalika bharti 2024: मध्ये ‘मानव संसाधन समन्वयक ‘ या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. हि पदे महानगरपालिकेत सरळसेवा पद्धतीने भरली जाणार आहेत. या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करा.
या पदांसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे. त्यांनी खालील संपूर्ण माहिती वाचावी या मध्ये किती जागांची भरती आहे? Registration Starting date, फॉर्म फीस, परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या तारखा याबद्दल माहिती दिली आहे.
Mumbai Mahanagarpalika bharti 2024
जाहिरात क्रमांक :MCGM/HR/2268.
पदाचे नाव :मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)
एकूण पद संख्या : 38
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा- CLICK HERE
BMC मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) NOTIFICATION PDF
मुंबई महानगर पालिकेने मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ ) पदाकरिता भरती जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा दिनांक २० फेब्रुवारी २०२४ करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३८ रिक्त जागा भरावयाच्या आहेत. या पदांबद्दल माहीत देणारे PDF उमेदवारांनी DOWNLOAD करावे.
शैक्षणिक पात्रता
BMC मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) यांमधील पदांसाठी अर्ज करताना खालील शैक्षणिक अटींची पूर्तता करावी लागेल. उमेदवारांनी पदासाठी अर्ज करताना खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
BMC मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) | 1. मान्यता प्राप्त विद्यापीठातुन पदवी पहिल्याच प्रयत्नात ४५% सह उत्तीर्ण होणे आवश्यक. किंवा इंजिनियरिंग पहिल्याच प्रयत्नात ४५% सह उत्तीर्ण होणे आवश्यक. 2.उमेदवाराकडे SAP HCM प्रमाणपत्र असावे. 3.उमेदवाराला INDIAN PAYROLL मधील PAYROLL CONFIGURATION, RUNNING PAYROLL ETC चा अनुभव असावा. 4.उमेदवाराने दहावी (SSC) किंवा HSC बारावी परीक्षेत मराठी व इंग्रजी हे १०० गुणांचे विषय घेऊन उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. 5.उमेदवार MSCIT हि संगणकाची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा |
वयोमर्यादा
Mumbai Mahanagarpalika bharti 2024 वयोमर्यादा आणि त्यामधील सवलत मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) या पदासाठी अर्ज करताना प्रवर्गाप्रमाणे सवलत देण्यात आली आहे. याबाबतची माहिती खालील तक्त्या मध्ये देण्यात आली आहे.
वयगणकयंत्र :येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.
प्रवर्ग | किमान वय | कमाल वय |
अराखीव | 18 वर्ष | 38 वर्ष |
मागासवर्गीय | 18 वर्ष | 43 वर्ष |
खेळाडू | 18 वर्ष | 43 वर्ष |
दिव्यांग | 18 वर्ष | 45 वर्ष |
प्रकल्पग्रस्त | 18 वर्ष | 45 वर्ष |
पदवीधर अंशकालीन उमेदवार | 18 वर्ष | 55 वर्ष |
परीक्षा फीस Mumbai Mahanagarpalika bharti 2024
‘मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या पदासाठी परीक्षा फीस ही ऑनलाईन भरावयाची आहे. हि फीस Non-Refundable असणार आहे. ऑनलाईन परीक्षा फीस ही खालीलप्रमाणे आकारली जाईल.
पदाचे नाव | खुला प्रवर्ग (Open Category) | मागास प्रवर्ग (Sc/St) | माजी सैनिक (Ex-Servicemen) |
मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ गट-क | 1000/- | 900/- | कोणतेही परीक्षा शुल्क नाही |
महत्वाची सूचना:
- ऑनलाईन परीक्षेच्या वेळेला येताना उमेदवाराने ई-पावतीची झेरॉक्स कॉपी प्रवेश पत्रासोबत आणावी.
- भरती काही कारणास्तव स्थगित/रद्द झाली तर उमेदवाराला परीक्षा फीस परत मिळणार नाही.
मानव संसाधन समन्वयक परीक्षा पद्धती
मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)ची परीक्षा हि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रश्नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. पुढील तक्त्यात परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे या बद्दल माहिती देण्यात आली आहे.
विषय | एकूण प्रश्न संख्या | एकूण गुण |
मराठी भाषा | 10 | 20 |
इंग्रजी भाषा | 10 | 20 |
सामान्य ज्ञान | 10 | 20 |
बौद्धिक चाचणी | 10 | 20 |
मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ ) पदा निगडित विषय | 60 | 120 |
महत्वाची सूचना(Mumbai Mahanagarpalika bharti 2024)
- परीक्षा कालावधी हा दोन तासांचा (2 Hours) असणार आहे.
- परीक्षेच्या एकूण गुणांपैकी 45 टक्केपेक्षा जास्त गुण घेतलेल्या उमेदवाराची निवड यादी तयार केली जाईल आणि त्यामध्ये जास्तीत जास्त गुण घेतलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल.
- व्याकरण आणि मराठी भाषा विषयाची परीक्षा फक्त मराठी भाषेतून होणार आहे. आणि इतर विषयांची परीक्षा हि इंग्रजी भाषेतून घेण्यात येणार आहे.
- इंग्रजी आणि मराठी विषयांच्या पेपरचे स्वरूप हे बारावी अभ्यासक्रमाच्या धर्तीवर आधारित असणार आहे.
- सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांच्या प्रश्नांचे स्वरूप हे पदवी परीक्षेच्या धर्तीवर असणार आहे.
- मानव संसाधन समन्वयक या विषयाचे स्वरूप हे पदवी पदवी परीक्षेच्या धर्तीवर असणार आहे.
- कोणतीही मौखिक चाचणी (Oral Test) परीक्षा घेण्यात येणार नाही.
मानव संसाधन समन्वयक परीक्षेचा अभ्यासक्रम
मुंबई महानगर पालिकेकडून घेण्यात येणाऱ्या मानव संसाधन समन्वयक या परिक्षेचा अभ्यासक्रम पुढील तक्त्यात देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी व्यवस्थित परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यासाठी अभ्यासक्रम पहावा.
परीक्षेचा अभ्यासक्रम
मराठी | सर्वसामान्य शब्दसंग्रह,वाक्यरचना म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ व्याकरण इत्यादी |
इंग्रजी | सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण इत्यादी |
सामान्य ज्ञान | मुंबई महानगर पालिका क्षेत्राचा भूगोल, सामाजिक इतिहास , हवामान इ. स्थानिक गोष्टी/ वैशिष्ट्य इत्यादी बद्दल माहिती |
बौद्धिक चाचणी | बौद्धिक चाचणी |
मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ पदाच्या अहर्तेशी निगडित विषय | SAP Certified Application Associte SAP HCM with ERP 6 EH P7 |
How To Apply Mumbai MahanagarPalika bharti 2024
- मानव संसाधन समन्वयक या परिक्षेसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
- फॉर्म भरताना चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारास परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात येईल.
- परीक्षा फीस हि देखील उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने भरणे गरजेचे आहे.
- उमेदवाराने वैध मोबाइलला नंबर आणि ई-मेल आयडी नोंदवावा याच ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर संपूर्ण भरती प्रक्रियेची माहितीची देवाणघेवाण होणार आहे.
- मुंबई महानगर पालिकेकडून याच ई-मेल आयडीवर ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र (hallticket) पाठवले जाईल.
- ई-मेल आयडी वैध नसल्यास अर्जदाराने फॉर्म भरण्यापूर्वी नवीन बनवून घ्यावा.
- online अर्ज Registration करण्याकरिता Click here for new Registraton ह्या tab निवडून त्यामध्ये नाव,संपर्काची माहिती व ई-मेल आयडी भरावा. Screen वर तात्पुरत्या स्वरूपाचा Registration Number व Password दिसेल.
- तात्पुरत्या स्वरूपाचा Registration Number व password ई-मेल आयडी व मोबाइल नंबर वर पाठवण्यात येईल.
- अर्जदाराने स्वतःची माहिती भरताना काळजीपूर्वक भरावी तसेच नावाचे spelling योग्य पद्धतीने लिहावे चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराने भरलेली सर्व माहिती पुन्हा पडताळण्यासाठी व save करण्यासाठी Validate your details and save and next या बटणाचा वापर करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर शेवटी अर्ज सबमिट करण्यापूर्वी प्रेविरहि टॅबवर क्लिक करून संपूर्ण अर्ज अचूक भरला आहे कि नाही याची खात्री करावी.
- एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर त्यामध्ये कुठलीही दुरुस्ती करण्यात येणार नाही.
- अर्जदाराने स्वतःचे नाव, सामाजिक प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छितो तो प्रवर्ग, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी माहिती योग्य पद्धतीने भरावी.
- ऑनलाइन (online) पद्धतीनेच फक्त अर्ज स्वीकारले जाणार आहेत. कोणत्याही उमेदवाराने पत्रव्यवहार द्वारे अर्ज पाठवू नयेत असे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करताना upload केलेली स्वाक्षरी व hall ticket वरील स्वाक्षरी ही एकाच प्रकारची असावी.
Photo आणि Signature upload करण्याबाबतच्या सूचना
Photo
- उमेदवाराने पासपोर्ट आकाराचा कलर फोटो upload करावा.
- फोटो काढताना टोपी, हॅट किंवा गॉगल घालून फोटो काढू नये.
- फोटोची साईज 20kb-50kb असावी. (pixels 200*230)
- 50kb पेक्षा आकाराने मोठा photo upload होणार नाही.
Signature
- अर्जदाराने सही करताना काळया शाई (Black Pen) च्या पेनाने सफेद कागदावर सही करावी.
- फॉर्म सोबत upload केलेली signature आणि Hall ticket वरील signature यांच्यात तफावत आढळून आल्यास उमेदवाराला अपात्र करण्यात येईल.
- Signature ची साईज 10kb-20kb असावी.(pixels 140*160)
- Signature ही 20kb पेक्षा मोठी असल्यास upload होणार नाही.
Hall Ticket Download करण्याबाबत सूचना
- online परीक्षेसाठी हॉल तिकीट मिळविण्यासाठी उमेदवाराने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
- हॉल तिकीट उपलब्ध झाल्या बाबतची माहिती उमेदवारांना registered email id/sms द्वारे पाठविण्यात येईल.
- उमेदवाराला दिलेल्या link ला click केल्यानंतर Hall Ticket Download करण्याची Window Screen दिसेल.
- Hall Ticket Download करण्यासाठी उमेदवाराने Registration Number Password/Date Of Birth चा वापर करावा.
परीक्षेबाबत सर्वसाधारण सूचना
परीक्षेला येताना उमेदवाराने खालील कागदपत्रे सोबत आणावी. खालील कागदपत्रे जर सोबत नसतील तर प्रवेश नाकारला जाईल याची काळजी घ्यावी.
- परीक्षेसाठी वैध प्रवेश पत्र (Hall Ticket)
- ओळखपत्र.(Original)
- ओळख पत्राची झेरॉक्स
- परीक्षा फीस भरल्याची पावती
- ज्या महिला उमेदवारांच्या नावात लग्नानंतर बदल झालाय त्यांनी राज पत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र(Affidavit)
Salary
BMC मानव संसाधन समन्वयक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा खालील प्रमाणे पगार मिळणार आहे.
25500 रुपये-81100 रुपये .
परीक्षेबाबत महत्त्वाच्या तारखा Mumbai Mahanagarpalika bharti 2024
BMC मानव संसाधन समन्वयक परीक्षेबाबत महत्त्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
परीक्षेची जाहिरात | 20 फेब्रुवारी 2024 |
Registration Start Date | 24 फेब्रुवारी 2024 |
Registration End Date | 15 मार्च 2024 |
Hall Ticket आणि परीक्षा दिनांक | लवकरच कळविण्यात येईल |
Frequently Asked Question
Ans: 38
Ans: 200 गुणांची परीक्षा होणार आहे.
Ans:18 वर्ष पूर्ण असावे.