स्टाफ सिलेक्शन भरती 2024||पदवी धारकांसाठी सुवर्णसंधी

नोकरी करण्याची सुवर्णसंधी. स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CPO 2024 मार्फत दिल्ली पोलीस तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF यामध्ये रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

SSC CPO 2024

जाहिरात क्रमांक

पदांची नावे-1. दिल्ली पोलीस. 2.केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

वयगणकयंत्र :येथे तुम्ही तुमचे वय मोजू शकता.

स्टाफ सिलेक्शन कमिशन ने पदाची सविस्तर माहिती देणारे PDF जाहीर केले आहे. यामध्ये एकूण 4187 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांविषयी संपूर्ण माहिती देणारे PDF खाली दिले आहे. पदाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील PDF डाऊनलोड करावे.

रिक्त जागा- स्टाफ सिलेक्शन कडून भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांची खालील तक्त्यामध्ये माहिती देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अशा दोन्ही रिक्त पदांमध्ये 4187 जागा भरणार आहेत.

POST NAMEUREWSOBCSCSTTOTAL
SUB INSPECTOR DELHI POLICE -MALE5613301709125
SUB INSPECTOR DELHI POLICE -FEMALE280615080461
SUB INSPECTOR CAPF -MALE149337110105472723693
SUB INSPECTOR CAPF -FEMALE12131874623308
TOTAL169842111426183084187

पोलीस उपनिरीक्षक दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अशा दोन्ही रिक्त पदांमध्ये 4187 जागा भरणार आहेत. या जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. खालील शैक्षणिक अटींची पूर्तता उमेदवार करत असतील तर उमेदवारांनी अर्ज करावा.

  • सदर पद भरती मध्ये भाग घेण्यासाठी उमेदवार हा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. जर उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असला तरीदेखील तो या पदासाठी अर्ज करू शकतो.
  • अशा उमेदवारांनी पदभरती निकालापूर्वी त्याने त्याची पदवी पूर्ण केलेली असावी.
  • पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे
    • मोटार सायकल
    • कार दोन्ही प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. लायसन शिवाय  उमेदवाराला या पदासाठी अर्ज करता येणार नाही.
  • जर उमेदवाराकडे सदरील लायसन्स नसतील तरीदेखील उमेदवार केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असेल.
  • जर उमेदवार हा दिल्ली पोलीस मध्ये कार्यरत असेल तर त्याने
    • कॉन्स्टेबल,
    • हेड कॉन्स्टेबल,
    • सहाय्यक उपनिरीक्षक या तिन्ही पदांपैकी एका पदावर तीन वर्ष काम केलेले असावे. त्याचे वय तीस वर्षापेक्षा जास्त नसावे.

वय -सदर पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराचे किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 25 वर्ष असावे.

  1. उमेदवाराने फॉर्म भरताना जी जन्मतारीख टाकलेली आहे. इयत्ता दहावीच्या बोर्ड क्रमांक बोर्ड सर्टिफिकेट वर आहे याची तपासणी करून घ्यावी.
  2. फॉर्म भरताना टाकलेली आणि प्रमाणपत्रावरची जन्म दिनांक एकच असावी.

या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फीस भरावयाची आहे. एकदा फीस भरल्यानंतर कुठल्याही कारणास्तव रक्कम ही उमेदवारांना परत केली जाणार नाही. ऑनलाइन परीक्षा फीस खालील तक्त्यात दिलेल्या माहिती प्रमाणे आकारली जाईल. परीक्षा फीस पूर्ण भरलेली असेल तरच अर्ज स्वीकारले जातील याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

प्रवर्गपरीक्षा फीस
खुला गट100/- Rs
अनुसूचित जाती/ जमाती /महिलाNo Fees
माजी सैनिकNo Fees

 सदर परीक्षा  एकूण ती चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

1) Paper 1-भरती प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात उमेदवारांचे बौद्धिक क्षमता तपासण्यासाठी एकूण दोनशे गुणांची  मल्टिपल चॉइस क्वेश्चन प्रकारचे असतील. याचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी असेल.

SubjectNumber of QuestionsMaximum Marks
General Intelligence and Reasoning5050
General Knowledge and General Awareness5050
Quantitative Aptitude5050
English Comprehension5050

2) Paper 2–  यामध्ये उमेदवाराचे इंग्रजी विषयाचे ज्ञान तपासले जाईल सदर पेपर मध्ये 200 प्रश्न असतील ज्याला प्रत्येकी एक गुण म्हणजे एकूण 200 गुणांचा असेल.

SubjectNumber of QuestionsMaximum Marks
English language & Comprehension20050
  • Paper 1 आणि Paper 2 प्रत्येकी दोन तासाचा कालावधी असेल.
  • Paper 1 & Paper 2 साठी निगेटिव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25  गुण मिळालेल्या गुणांमधून कमी केले जातील.
  •  दोन्ही पेपर मध्ये मिळालेल्या एकूण गुणांवर कट ऑफ लावला लागेल जाईल त्यानुसार फायनल मेरिट लावले जाईल.
  • उमेदवाराने दोन्ही पेपर मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा.
  • सदर परीक्षेनंतर कमिशन मार्फत अधिकृत संकेतस्थळावर उत्तरतालिका (Answer Key) प्रसिद्ध केली जाईल.

 जर उमेदवाराने  माध्यमिक शिक्षण घेत असताना एनसीसी मध्ये भाग घेतला असेल तर त्याला इथे फायदा होणार आहे.त्याला एनसीसीच्या सर्टिफिकेशन वर बोनस मार्क्स मिळणार आहेत.

Sr. NoType of NCC CertificateBonus Marks in each Paper (Paper-I and Paper-II)
1NCC ‘C’ Certificate10 marks (5%of the maximum Marks)
2NCC ‘B’ Certificate6 marks (3%of the maximum Marks)
3NCC ‘A’ Certificate4 marks (2% of the maximum Marks)

3) Physical Standard Test & Physical Endurance Test

Sr. NoCategory of candidatesHeight (in cm)Chest (in cm)
1Male candidates170 cmUnexpanded 80 Expanded 85
2 Male Candidates belonging to Hill areas of Garhwal, Kumaon, Himachal Pradesh, Gorkhas, Dogra’s, Marathas, Kashmir Valley, Leh & Ladakh regions, North-Eastern States and Sikkim165 cmUnexpanded 80 Expanded 85
3All candidates belonging to Scheduled Tribes162.5 cmUnexpanded 77 Expanded 82
4Female candidates157 cm
5Female candidates belonging to Hill areas of Garhwal, Kumaon, Himachal Pradesh, Gorkhas, Dogra’s, Marathas, Kashmir Valley, Leh & Ladakh regions, North Eastern States and Sikkim155 cm
6All female candidates belonging to Scheduled Tribes154 cm

Physical Endurance Test

For Male Candidates

  • 100 मीटर धावणे.
  • 1.6 किलोमीटर धावणे.
  • लांब उडी 3.65 मिटर.
  •  उंच उडी.
  • गोळा फेक

For Female Candidates

  •  100 मीटर धावणे.
  •  800 मीटर धावणे.
  •  लांब उडी.

4)  मेडिकल टेस्ट-हा परीक्षेचा शेवटचा टप्पा असेल सर्वात शेवटी उमेदवारांचे फिटनेस चेक करण्यासाठी मेडिकल टेस्ट घेतली जाईल.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांनी रीतसरर अर्ज केल्यानंतर त्यांची छाननी केली जाईल. दिलेल्या नियम व अटी पूर्ण करून उमेदवाराने अर्ज केला असेल त्याला परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल. परीक्षे संदर्भात  माहितीसाठी अधिकृत संकेत स्थळाला वेळोवेळी भेट द्यावी.
  • पेपर एक मध्ये ठरवून दिलेले किमान गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पी एस टी साठी बोलावले जाईल.
  • पेपर एक आणि पेपर दोन मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवाराला मेडिकल एक्झाम साठी बोलाविले जाईल. या दोन्हीसाठी मिनिमम क्वालिफाय मार्ग खालील प्रमाणे असतील.
  • फायनल सिलेक्शन पेपर एक आणि दोन यामध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारावर घरावर केले जाईल.
CATEGORYMinimum Qualify Marks
Unreserved 30%
OBC/EWS25%
SC/ST20%

यशस्वी उमेदवारांचे पोलीस उपनिरीक्षक दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांवर निवड होणार आहे. उमेदवारांना खूप चांगल्या दर्जाच्या सुख सुविधा आणि पगार मिळणार आहे.

पुढील तक्त्यामध्ये पगाराबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

पदपगार
पोलीस उपनिरीक्षक दिल्ली पोलीसRs 35400-112400
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल Rs 35400-11200

खालील तक्त्यामध्ये स्टाफ सिलेक्शन पदभरती बद्दल महत्त्वाच्या तारखा दिल्या आहेत.

यामध्ये परीक्षेची घोषणा कधी करण्यात आली. परीक्षेची नोंदणी चालू दिनांक तसेच परीक्षा नोंदणी करण्याची शेवटची तारीख याची माहिती दिली आहे.

SSC CPO 2024 Notification Release Date4 MARCH 2024
SSC CPO 2024 Registration Date4 MARCH 2024
SSC CPO 2024 Last Date To Apply28 MARCH 2024
SSC CPO 2024 Exam DateMAY MONNTHS DATE 9,10 AND 13
1.स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एकूण किती पदांची जाहिरात करण्यात आली आहे?

ANS.स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एकूण 4187 पदांची जाहिरात करण्यात आली आहे.

2.स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कोण कोणत्या पदांची भराठी होणार आहे?

ANS.स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये पोलीस उपनिरीक्षक दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अशा पदांची भरती केली जाणार आहे.

3.स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO ची परीक्षा पद्धती कशी आहे?

ANS.परीक्षा पद्धतीमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन पेपर घेतले जाणार आहेत.
प्रत्येक पेपर 200 मार्कांसाठी असणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जाणार आहेत.

4.SSC CPO ची परीक्षा कधी होणार आहे?

ANS.स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा मे महिन्याच्या पुढील तारखांना होणार आहे.
9 मे, 10 मे आणि 13 मे 2024 तारखांना होणार आहे.